सद्गुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहू ।
ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू ॥ धृ ॥
निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तु किती तुज शीण देऊ ।
हृदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहू ॥ १ ॥
उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू ।
बोधूनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ ॥ २ ॥
कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू ।
करी मज ऎसा निर्भय निश्चल सम सकला पाहू ॥ ३ ॥
अजाण हतबल भ्रमित मनिची तळमळ कशी साहू ।
निरसूनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू ॥ ४ ॥

Comments
Post a Comment