Skip to main content

Posts

Showing posts from December, 2011

श्री सद्गुरु प्रार्थाना

सद्गुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहू । ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू ॥ धृ ॥ निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तु किती तुज शीण देऊ । हृदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहू ॥ १ ॥ उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू । बोधूनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ ॥ २ ॥ कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू । करी मज ऎसा निर्भय निश्चल सम सकला पाहू ॥ ३ ॥ अजाण हतबल भ्रमित मनिची तळमळ कशी साहू । निरसूनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू ॥ ४ ॥